आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने वाय २०-भारत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या अध्यक्ष डॉ.ताराताई हातवळणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल खंडेलवाल होते. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. जगदीश साबू उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर परीक्षक डॉ. शिवाजी नागरे, डॉ. प्रसन्न पांडे, प्रा.शेखर दीक्षित, प्रा. अदिती मानकर उपस्थित होत्या. जागतिक स्तरावरील जी-२० संघटनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत वाय-२० स्थापन करून भारतातील विविध संस्थांमध्ये १८ आंतरराष्ट्रीय बैठका होत आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका महाविद्यालयाची निवड करून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
स्पर्धेकरिता भविष्यातील कामकाज ४.० नवीनता व एकविसावे शतकातील कौशल्य, हवामान बदल आणि आपत्ती धोका कपात टिकाऊपणा जगण्याचा एक मार्ग, शांतता निर्माण आणि समेट युद्धरहित नवीन युगात प्रवेश, शेअर सामायिक भविष्य लोकशाही आणि शासनात युवांचा सहभाग, स्वास्थ कल्याण आणि खेळ युवकांसाठी आराखडा या विषयावर रेणुका नाळे, अमन जैन, रोहन गोडले, श्रुती म्हैसने, विनिता मौर्या, श्वेता दीक्षित, ऋषा वसु, सार्थक ठाकरे, वैष्णवी राठोड, आलोक जयस्वाल,राधेश्याम राठोड, आनंद सपकाळ या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यातील पाच विद्यार्थ्यांची पुणे येथे राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. स्पर्धेचे प्रास्ताविक स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. निशा वराडे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.