आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून जवळच असलेल्या करोडी फाट्यावर स्व. दादाभाऊ मानकर स्मृती प्रित्यर्थ जंगी शंकर पटाला सोमवारी प्रारंभ झाला. बुधवार ६ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या पटासाठी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह दाखल झाले आहेत.
गत सात-आठ वर्ष बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाच्या आदेशाने उठल्यानंतर पट प्रेमींमधे उत्साह संचारला आहे. जिल्ह्यात पारा ४४ वर गेलेल्यानंतरही पट पाहायला बघ्यांची गर्दी उसळली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांच्या हस्ते धावपट्टीचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल दातकर, रवी पाटील अरबट, कपिल ढोके, राजकुमार मंगळे, अमोल काळणे, निनाद मानकर, गणेशराव राऊत, श्याम गावंडे यांच्यासह आयोजन समितीचे धीरज गावंडे, अरविंद बोरचाटे, अनंतराव धुमाळे,भाग्येष खोले, अक्षय कराळे,सागर गेंद,,पवन भाकरे,लंकेश धुमाळे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
असे देण्यात येणार शंकरपटातील विजेत्यांना बक्षीस
ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीत या ठिकाणी एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे त्यामुळे पंचक्रोशीतील व राज्यातील अनेक नामवंत बैलजोड्या दाखल होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलांची, त्यांच्या मालकांची व बघायला येणाऱ्या पटप्रेमींची चोख व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.