आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका परिसरात साकारण्यात आलेल्या विजयस्तंभाच्या प्रतिकृतीसमोर दिवसभरात हजारो नागरिकांनी शहीद झालेल्या शूर सैनिकांना मानवंदना दिली. अशोक वाटिकेतही दिवसभर मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
कोरेगाव भीमा याठिकाणी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक लढाई झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून शौर्य दिनी विजय स्तंभासमोर मानवंदना दिली जाते. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनाही या पराक्रमी इतिहासाची कायम आठवण राहावी, शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करता यावे यासाठी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची 45 फुट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन व वंदना संघातर्फे अशोक वाटिका येथे विजय स्तंभ उभारून शहिद झालेल्या शूर 500 सैनिकांना मानवंदना देण्यात येणार आली.
वैचारिक पुस्तके
शौर्य दिनानिमित्त अशोक वाटिका परिसरात विविध वैचारिक पुस्तके, महामानवांचे फोटो, मूर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत. सकाळपासूनच वैचारिक पुस्तकांच्या खरेदीला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अबालवृद्धातील अशोक वाटिकेतील महामानवांच्या पुतड्यासमोर अभिवादन केले. पहाटेपासून अशोक वाटिकेत नागरिकांची गर्दी आहे.
गायनाने होणार समारोप
अशोक वाटिकेसमोर सायंकाळी साऊथ आफ्रिका रिटर्न प्रसिध्द गायक प्रकाशदीप वानखडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा, लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन वंदना संघ आणि सम्राट अशोक सेना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.