आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर शिंदेंच्या गटाकडून नियुक्त्या जाहीर:दाेन जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखांसह पाच पदांची घाेषणा

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून बुधवारी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात दाेन जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुखांचा समावेश आहे. नियुक्त्यांची घाेषणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केल्या.

राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून जिल्ह्यात राजकीय पेरणी सुरू झाली असून, शिवसेनेच्या 26 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी 28 जुलै राेजी मुबंईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेश केला हाेता यात माजी आमदार बाजाेरीया त्यांचे पूत्र आमदा विल्पव बाजाेरीया यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता. दरम्यान बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया साहेब यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील, उदय सामंत प्रतोद भरतशेट गोगावले आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील खालील नियुक्त्या जाहीर केल्याचे गटातर्फे कळविण्यात आले.

अशी आहे कार्यकारीणी

१) अश्विन उद्धवराव नवले - जिल्हाप्रमुख (अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, अकोट)

२) विठ्ठल सरप - जिल्हाप्रमुख (बाळापूर, अकोला पूर्व)

३) योगेश रुपचंद अग्रवाल :- अकोला महानगर प्रमुख

४) शशिकांत वामनराव चोपडे - उपजिल्हाप्रमुख

५) योगेश राजू बुंदिले - निवासी उपजिल्हाप्रमुख.

अन्य पदाधिकाऱ्यांचे काय?

अकाेल्यात शिवसेनेच्या 50 ते 60 आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची शिंदे गटात सहभागी हाेण्याच्या अनुषंगाने बैठक झाली हाेती. त्या बैठकित शिवसेनेत कसे डावलण्यात आले. याचा पाढाच वाचण्यात आला हाेता. या बैठकीत महिला पदाधिकारीही हाेत्या. मात्र तुर्तास तरी बुधवारी जवळपास 26 जणच गटात सहभागी झाले. त्यापैकी एकूण 6 जणांनाच पदांची जबबादारी देण्यात आली आहे. त्यामुळे बैठकीतील अन्य पदाधिकारी शिंदे गटात सहभागी हाेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...