आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या चार पैकी तीन मुली असून, एक मुलगा आहे. अनेकांनी अभ्यास करतानाही छंद जोपासत परीक्षेत बाजी मारली.
विधी जखोटीया : तणाव आल्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा केली; अभ्यासात सातत्य ठेवले अन ९८.३३ टक्के गुण मिळवले. मूळची मंगळरुपीरची रहविासी विधी सुखदेव जखोटीया या वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनीला ६०० पैकी ५९० गुण मिळाले. घरातच शिक्षणासाठी पोषक वातावरण. सहा ते सात तास अभ्यास करीत ती खासगी शिकवणी वर्गाला नियमित जात होती. सनदी लेखापालची (चार्टर्ड अकाऊंटट) तयारी करणाऱ्या विधीला ताण आल्यास ती कुटुंबीयांशी चर्चा करायची. अभ्यासाची आवड असलेल्या विधीला आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करणे आवडते. खडतर कामाची तिचा इच्छा असते. एकीकडे सनदी लेखापालाचे वर्ग करतानाच दुसरीकडे बारावीचा अभ्यास सुरू होता. गतवर्षी डिसेंबरनंतर सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम बाजूला ठेवत तिने बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. चित्रकला, नृत्य असे छंदही तिने जोपासत यश संपादन केले.
खुशी खेतान : वाचनाचा छंद जोपासत ९५.८३ टक्के गुण मिळवत घेतली भरारी: रामदास पेठ परिसरात राहणाऱ्या खुशी विक्रम खेतान हिने वाणिहिज्य शाखेतून ९५.८३ टक्के गुण मिळवत गगन भरारी घेतली. कॉटनचा व्यवसाय असलेले तिचे वडिलही उच्च शिक्षित असून, घरातून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. तिला मुळाच वाचनाचा छंद आहे. या छंदाचा फायदा तिला होत असून, त्यातूनच अभ्यासाची गोडी निर्माण झाली. रोज ९ ते १० तास अभ्यास करीत होती. ३ ते ४ चार तास अखंड अभ्यास केल्यानंतर ती थोडा वेळ ब्रेक घ्यायची. मग पुन्हा अभ्यास करीत होती. ती चार्टर्ड अकाऊंटट अभ्यासक्रमाची ती तयारी करीत आहे. दोन वर्षांपासून अभ्यास सुरू आहे. मुळात तिला याच क्षेत्राची आवड असल्याने ती आवडीने अभ्यास करते. याचा फायदा तिला बारावीच्या परीक्षेत झाला.
भूमी लोहिया : आईला घरकामात मदत करीत कमावले ९६ टक्के गुण : घरातील कामाचा फारसा ताण नव्हता. मात्र अत्यावश्यक वेळी आईला घर कामात मदत करीत भूमी हरिष लोहिया हिने ६०० पैकी ५७६ गुण मिळवले. वाणिज्य शाखेतून ९६ टक्के गुण मिळालेल्या भूमीला चार्टर्ड अकाऊंटट व्हायचे आहे. बारावीत असताना आजी आजारी पडली. त्यामुळे आई-वडिलांना आजीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागले. अशा अत्यावश्यक प्रसंगी तीने घरकामात मदत केली. अर्थात ऐरवी तिला घरकाम करावे लागले नाही. घर काम करताना तिने अभ्यासकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. दिवसभरात ९ ते १० तास अभ्यास कसा होईल, याचे नियोजन तिने केले. ३ तास अखंड अभ्यासानंतर ती ब्रेक घेत असे. चित्रकला, गायनाचा छंद जोपासल्याने तिला फ्रेश वाटायचे आणि पुन्हा अभ्यासाला लागत होती.
ओम जामोदे : घरापासून लांब राहत, छंद बाजूला ठेवत मिळवले ९६ टक्के गुण : मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहविासी असलेला ओम संजय जामोदे हा शिक्षणासाठी अकोल्यात रुम घेऊन राहतो. वडिलांचा मोबाइल फोन दुरुस्ती, केबलचा व्यवसाय असून, घरी सुट्टीत गेल्यानंतर ओमही दुकानावर बसत असे. रोज कमिान ८ तास अभ्यासाचे नियोजन केले. अभ्यासात सातत्य ठेवले आणि ६०० पैकी ५७६ गुण मिळवले. त्याला क्रिकेट खेळणे, सामने पाहणे यासारखे छंद आहेत. मात्र अभ्यासात छंदांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची त्याने काळजी घेतली. काही वेळ छंद बाजूला ठेवले. मनाला आवर घातला. त्याचा फायदा त्याला बारावीत झाला. त्याच्या घरातच शिक्षणासाठी पोषक वातावरण आहे. बहिण अभियंता असून, काकाही उच्च शिक्षित आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा त्याला झाला आणि त्याने बारावीत घवघवीत यश प्राप्त केले.
गायन क्षेत्रात करायचे करिअर : बारावीनंतर पुढे कला शाखेतूनच शिक्षण घेवून वैभवीला संगीत क्षेत्रातच करीअर करायचे आहे. गाण्याचा छंद तिने जोपासला आहे. यशाचे श्रेय तीने मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, आई-वडीलांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.