आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांना 'ते' वक्तव्य भोवलं!:अकोल्यात शिवसैनिक आक्रमक; रास्ता रोको करत कोश्यारींच्या प्रतिमेला मारले जोडे

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह काेश्यारी आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे रविवारी अकाेल्यात तीव्र पडसाद उमटले. या वक्तव्याचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निषेध करीत आक्रमक पवित्रा घेतला.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती भाग असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ रास्ता राेकाे केले. आंदाेलनात राज्यपाल व भाजप प्रवक्त्यांच्या छायाचित्रावर जाेडे मारत शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावानांना वाट माेकळी करून दिली.

कोश्यारींच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

राज्यपालांनी औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत साेहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे 20 नाेव्हेंबरला अकाेल्यात आंदोलन करण्यात आले. कोश्यारींने केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध केला. आंदाेलनात अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर यांच्यासह माजी नगरसेिवका मंजुषा शेळके, गजानन शेळके, उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, महिला आघाडीच्या संघटिका देवश्री ठाकरे, शुभांगी किणगे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अभय खुमकर, नितीन मिश्रा, रुपेश ढाेेरे आदी सहभागी झाले हाेते.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. राज्यपाल काेश्यारी यांना इतिहास माहीत नसून, याबाबत त्यांनी बोलू नये. त्यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली असून, आम्ही त्यांना क्षमा करणार नाही. या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. संबंधितावर कार्यवाही न झाल्यास शिवप्रेमी आक्रमक हाेतील आणि त्याची जबाबदारी सरकारवरच राहिल, असा इशारा शिवसेनेचे पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला.

असे केले आंदाेलन

  • दीड वाजता शिवसैनिकांनी रास्ता राेकाे आंदाेलन सुरू केले. फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांचा जाहीर निषेध’, असे नमूद हाेते. तसेच यावर राज्यपाल व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचेही छायाचित्र हाेते. शिवसैनिकांनी घाेषणा देत या छायाचित्राना जाेडे मारले.
  • रास्ता राेकाे करणाऱ्या शिवसैनिकांना पाेिलसांनी बाजूला हटण्यास सांगितले. मात्र शिवसैनिकांनी हटण्यास नकार दिल्याने पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. शिवसैनिक तेथून हटत सिटी काेतवालीकडे रवाना झाले.

काय म्हणाले हाेते राज्यपाल ?

  • राज्यपाल:- छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगातील असून, आता नितीन गडकरी, शरद पवार हे आहेत, असे भगसिंह काेश्यारी म्हणाले हाेते.
  • भाजप प्रवक्ते:- स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या माफिबाबत सुधांशु त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत वक्तव्य केले हाेते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेब यांना पाच वेळा पत्र लिहिले हाेते, असे त्रिवेदी म्हणाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...