आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांची टाेळीच असल्याची टिका करीत शिवसेनेने मंगळवारी आत्मक्लेश आंदाेलन केले. िजल्हाधिकारी चाैकात राज्यपाल आिण भाजप नेत्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे त्यांच्या फाेटाेसह माेठे फ्लेक्स लावत शिवसेनेने भाजपचा निषेध नाेंदवला.
राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद तीव्र पडसाद उमटत आहेत. कधी क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुलेंवरील वक्तव्यामुळे तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुंवर केलेल्या वक्तव्यामुळे तर , महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असलेल्या काळात मराठी माणसांना कमी लेखल्याने राज्यपाल भगतसिंह काेश्यारी वादात अडकले हाेते. दरम्यान . शिवसेनेने आंदाेलन करीत घाेषणा दिल्या. आंदाेलनात जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, महिला आघाडीच्या नेत्या ज्याेत्सना चाेरे, संताेष अनासने, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, मंगेश काळे, गजानन बाेराळे, मुकेश मुरुमकार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभय खुमकर, अनील परचुरे आदी सहभागी झाले.
शिवसैनिकांनी दिल्या घाेषणा
भाजप हा शिवद्राेही आहे, त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेने केली. आंदाेलनात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी अशा घाेषणा दिल्या.
इतिहासाचा अभ्यास करावा
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रात राहुनही भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत नाही. भाजप वारंवार महापुरुषांचा अपमान करीत आहे. त्यामुळे त्यांनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा. याप्रकरणी संबंिधतांवर कार्यवाही न झाल्यास शिवप्रेमी आक्रमक हाेतील आणि त्याची जबाबदारी सरकारवरच राहिल, असा इशारा शिवसेनेचे पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला.
फाेटाे व वादग्रस्त वक्तव्य थेट फलकावर
राज्यपाल व भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महारा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची मािहती देणारे माेठे फ्लेक्स संबंधित नेत्यांच्या फाेटाेसह लावण्यात आला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.