आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीतील नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर आता अकाेला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला येथील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. आमदार देशमुख यांचा फोन सकाळपासून स्वीच ऑफ आहे. आ. देशमुख हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदि निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. तसेच शिवसेनेच्या काही आमदारांचे फाेनही बंद असून, यात बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचाही फाेन बंद आहे. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून नितीन देशमुख विजयी झाले हाेते. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार हाेण्याचा मान देशमुख यांना मिळाला हाेता. देशमुख यांना 69 हजार तर वंचित बहुजन आघाडीने डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांना 50 हजार मते मिळाली हाेती.
काय आहे तक्रारीत?
आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाणे स्टेशनला दिलेल्या तक्रारीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उहापोह केला आह.आमदार देशमुख हे 16 जून रोजी रात्री विदर्भ एक्सप्रेस ने मुंबई येथे गेले होते. ते 17 जून रोजी मुंबई येथे पोहोचले. त्यांनी मला 20 जून रोजी सायंकाळी मुंबई येथून अकोला करता निघत असल्याचे मला सांगितले. मी त्यांना सायंकाळी फोन नाही केला. परंतु त्यांचा फोन बंद होता. आज 21 जून रोजी माझे पती आमदार देशमुख हे अकोला येथे पोहोचणे आवश्यक होते, परंतु ते पोहोचले नाही व त्यांचा मोबाइल ही बंद आहे . मी त्यांचे मुंबई येथील मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळी यांना यांनी संपर्क साधला. मी त्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे का, असा मला दाट संशय आहे. त्यामुळे माझे पती नितीन देशमुख यांच्याशी संपर्क होत नसल्याने मी हरवल्याबाबत तक्रार नोंदवत आहे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.