आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचाही फोन सकाळपासून बंद आहे. देशमुख हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असून, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने देशमुख यांच्या मतदारसंघात 35 कोटींपेक्षी जास्त विकास कामे मंजूर केली होती. देशमुख यांचे निकवटवर्तीयही अकोल्यात असून, ते त्यांच्याही संपर्कात नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा पहिला आमदार
शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. तसेच शिवसेनेच्या काही आमदारांचे फोन देखील बंद आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून नितीन देशमुख विजयी झाले होते. मात्र बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान देशमुख यांना मिळाला होता. ते 18 हजार 778 मतांनी विजय झाले होते. तसेच यांना 69 हजार 343 तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना 50 हजार 555 मतं मिळाली होती.
राजकारणात सक्रिय
नितीन देशमुख हे पंचायत समिती सदस्यापासून ग्रामीण भागातील राजकारणात सक्रिय आहेत. सभापती, जि. प. सदस्य, कृषी सभापती आणि आमदार असा त्यांचा आतापर्यंत राजकीय प्रवास आहे. 2019 ची लोकसभा आणि नंतर झालेली विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेच युतीमध्ये लढवली होती. दोन्ही बाजूने निवडणुकीत एकमेकांना मदत झाली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यात आ. देशमुख व भाजप नेत्यांकडून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.