आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध प्रभागात नालीतून काढलेला कचरा उचलण्यासाठी असलेल्या दोन चाकी गाड्यांची दुरवस्था झाली आहे. चार महिन्यांपासून या गाड्यांची मागणी करूनही गाड्या उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी ६ जानेवारीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. स्वच्छता विभागाने सात दिवसात कचरा वाहून नेणाऱ्या दोन चाकी गाड्यांचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्या नंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभागातील नाल्यांची साफ-सफाई केल्यानंतर नालीतून काढलेला कचरा दोन चाकी गाडीत टाकून गल्लीं बोळातून ट्रॅक्टर मध्ये टाकला जातो, मात्र या दोन चाकी गाड्या खूप जीर्ण झाल्याने या गाड्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे नाली साफ केल्यानंतर नालीतील काढलेली घाण व कचरा सर्व्हीस गल्लीत तसेच रस्त्यालगत पडलेला आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मनपातील अधिकाऱ्यांना तसेच आरोग्य विभागाला दोन चाकी गाड्या पुरवण्याची मागणी केली, या अनुषंगाने चार महिन्यात चार पत्र देऊनही दोन चाकी गाड्या प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे अकोला पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पुर्व प्रमुख अतुल पवनीकर यांच्या नेतृत्वात मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या वेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन महापालिका कार्यालय परिसर दणाणून सोडला. या ठिय्या आंदोलनात माजी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाूण, मंजुषा शेळके, अनिता मिश्रा, सुनिल दुर्गिया, रोशन राज, गजानन बोराळे, अनिल परचुरे, रूपेश ढोरे, छोटू दुर्वे, दीपक पांडे, लक्ष्मण पंजाबी, गणेश बुंदेले, आकाश ठाकुर, सुरेश इंगळे, रवी मडावी, विक्कीे ठाकुर, आकाश राऊत, नारायण मानवटकर, विश्वास शिरसाट, रवी अवचार, सुनिता श्रीवास, आशू वानखडे, आशू तिवारी, बाळू चव्हाुण आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अन्यथा तीव्र आंदोलन करू ः महापालिका सक्तीने मालमत्ता कर वसुली करीत आहे. सील लावण्याची कारवाई देखील सुरू आहे, मात्र सोई-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन चाकी गाड्या सात दिवसात उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अकोला पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.