आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात भीषण अपघातात एकाचा मृत्यू:शिवशाही बस व मालवाहू वाहनाची समोरा-समोर धडक, प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ रविवारी सकाळी दहाच्या सुमारास नागपूर ते शेगावकडे जाणारी शिवशाही बस व एका मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्याळा नजीक शेगाव डेपोची नागपूर-शेगाव बसवर बस क्रमांक एमएच 06 बी. डब्ल्यू. 3562 समोरुन भरधाव येणारे मालवाहू वाहन क्रमांक एम.एच. 27 बी. एक्स. 2231 या वाहनाने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली.

या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक अजय सुभाषराव तिकांडे (वय 46 वर्ष ) हा जागीच ठार झाला, तर गजानन धर्माळे ( वय 30 वर्ष) हा जखमी झाला. दोन्ही रा. बोरगाव (धर्माळे) येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले व जखमी युवकाला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बसच्या चालकाची प्रसंगावधानता

शिवशाही बस शेगाव आगारातील होती. बसमध्ये 35 प्रवासी होते. अपघाता वेळी चालकाला मालवाहू वाहनाच्या अनियंत्रित वेगाचा अंदाज आला. यामुळे चालकाने ताबडतोब बसचा वेग नियंत्रित केला. यामुळे शिवशाही बसच्या केवळ पुढच्या काचा फुटल्या व बसमध्ये उपस्थित संपूर्ण प्रवासी सुरक्षित बचावले. प्रसंगावधान राखल्यामुळे चालक बाळकृष्ण मोरे लोहारा ता. बाळापूर व वाहक ज्ञानेश्वर शेगोकार देगाव ता. बाळापूर यांचे प्रवाशांनी आभार मानले.

अकोल्यात बेफाम वाहतूक

दरम्यान, या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक व अवजड वाहतूक होताना दिसत आहे. जागोजागी रस्त्याचे काम सुरू असून अनेकदा अवजड वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे पालन होत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी बेशिस्त चालकांवर पोलिसांनी वचक बसवायला हवा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...