आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाचा अपघात:शिवशाही बस- मालवाहू वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

बाळापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ रविवारी सकाळी दहाच्या सुमारास नागपूर ते शेगावकडे जाणारी शिवशाही बस व एका मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्याळाजवळ शेगाव डेपोची नागपूर-शेगाव बसवर बस क्र एमएच ०६ बी. डब्ल्यू. ३५६२ समोरुन भरधाव येणारे मालवाहू वाहन क्र एम.एच.२७ बी. एक्स. २२३१ ने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक अजय सुभाषराव तिकांडे (वय ४६ वर्ष ) हा जागीच ठार झाला, तर गजानन धर्माळे ( वय ३० वर्ष) हा जखमी झाला. दोघेही बोरगाव (धर्माळे) येथील रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातातील जखमी युवकाला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बसचालकाने दाखवले प्रसंगावधान ही शिवशाही बस शेगाव आगारातील होती. बसमध्ये ३५ प्रवासी होते. अपघातावेळी बस चालकाला मालवाहू वाहनाच्या अनियंत्रित वेगाचा अंदाज आला. चालकाने ताबडतोब बसचा वेग नियंत्रित केला. यामुळे शिवशाही बसच्या केवळ पुढच्या काचा फुटल्या व बसमध्ये उपस्थित संपूर्ण प्रवासी सुरक्षित बचावले. प्रसंगावधान राखल्यामुळे चालक बाळकृष्ण मोरे लोहारा ता. बाळापूर व वाहक ज्ञानेश्वर शेगोकार देगाव ता. बाळापूर यांचे प्रवाशांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...