आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला शहरातील जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारस एक धक्कादायक प्रकार समोर आला. सौनिक असलेल्या चिखलगाव येथील कपिल गुलाबराब तायडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे कालच कपिलवर पातूर पोलिस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बदनामी सहन न झाल्याने कपिलने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
सोमवारी पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत एका युवतीने आरोपीविरूद्ध तक्रार केली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, दुसऱ्या मुलिशी विवाह जुळविला. प्रेयसीने दिलेल्या फिर्यादीवरुन पातूर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सात वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये दोंघात शारीरिक संबंध प्रस्तापित झाले होते. काही दिवसांनी कपिल हा सैन्यात भरती झाला व ट्रेनिंगसाठी सिकंदराबाद येथे निघून गेला. दरम्यान तक्रारदार मुलगी ही देखील नोकरीसाठी पुण्यात राहत होती. नुकतेच आरोपी एक महिन्याच्या सुट्टीत पीडितेच्या पुणे येथील रुमवर दोन दिवस राहिला. त्यानंतर गावी चिखलगाव येथे आला. त्याने पीडितेचा फोन ब्लॉक लिस्टमध्ये टाकला.
प्रेम एकीवर लग्न जोडले दुसरीशी
मुलीने नातेवाईकांना विचारणा केली. फिर्यादिला त्याचे दुसऱ्या एका मुलीशी साक्षेगंध झाले असल्याचे समजले. पीडित मुलीने आपल्या पालकांसह सोमवारी पातूर पोलिस ठाण्यात येऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणात 19 डिसेंबर रोजी कपिल गुलाबराव तायडे याच्या विरोधात पातूर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 406/ 22 कलम 376, 376 (2) (एन), 376 (3), 506, कलम 3,4 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा केली करण्यात आला होता.
आज सकाळी युवकाने केली आत्महत्या
आज सकाळी जुने शहर पोलिसांना हिंगणा रोड स्थित विराज पार्क येथे सकाळी पाच वाजता एक युवक गळफास घेतलेल्या परिस्थितीत लटकला असल्याची माहिती प्राप्त झाली. जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अधिक तपास केला असता मृतकाचे नाव कपिल गुलाबराव तायडे रा. चिखलगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविला आहे. प्रकरणाचा कसून तपास पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.