आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील धक्कादायक घटना:21 वर्षीय कुपोषित तरुणीवर वारंवार अत्याचार, राहिली 5 महिन्यांची गर्भवती; आरोपींना कोठडी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • a

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका खेट्री चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील 21 वर्षीय आदिवासी कुपोषित महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 1 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत आदिवासी भागातील एका गावातील पीडितेचे वडील पिकावर राखण करण्यासाठी शेतात राहत होते. त्यांची मुलगी कुपोषित असल्याने ती एकटी घरी राहत होती. त्याचा गैरफायदा घेऊन जगन्नाथ वाघू पांडे (वय 22 वर्ष ) व सीताराम किसन करवते ( वय 28 वर्ष) या दोघांनी 2022 च्या मार्च महिन्यापासून कुपोषित महिलेवर वारंवार अत्याचार केला. त्यामुळे कुपोषित महिला पाच महिन्यांची गर्भवती झाली. या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने पोलिसात दिली तक्रार

मागील अनेक महिन्यांपासून पिडीत अत्याचार सहन करीत होती. शेवटी तिच्या संयमाचा बांध फुटला. पिडीत महिलेने 1 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री चान्नी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. तिने संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितले. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला व आरोपीचा शोध घेतला. शुक्रवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना तत्काळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेमुळे खळबळ

चन्नी पोलिस स्टेशन अंतर्गत यापूर्वी सुद्धा आदिवासी महिलांवर अत्याचाराचे प्रकरण पुढे आले आहेत. मद्यपाजून मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. हे अत्याचार कधी थांबतील असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...