आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण या महिन्याला धार्मिक महत्त्व:श्रावण मासारंभ : मंदिरे सजली, परिसरात चैतन्य

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढ महिन्यातील अमावास्येनंतर श्रावण महिन्याला सुरूवात होते. यंदा शुक्रवार,दि. २९ जुलै रोजी श्रावण मासारंभ झाला. श्रावण या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर हा पहिला श्रावण महिना आहे.

त्यामुळे मंदिरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भक्तांनी पहिल्याच दिवशी शिव मंदिरांमध्ये गर्दी पहावयास मिळणार आहे. अकोलेकरांचे ग्रामदैवत राजराजेश्वरात येथे शुक्रवारी श्रावण महिना आरंभानिमित्त विशेष पूजा झाली. यानंतर दिवसभर भक्तांनी राजराजेश्वराचे दर्शन घेतले.

मंगळागौरीच्या पूजनाला होणार सुरुवात
श्रावणात मंगळागौरी ची पूजा म्हणजे महिलांसाठी उत्सवच असतो. नववधू मंगळागौरीची पूजा करतात. लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्षे हे व्रत करून नंतर त्याची सांगता करायची असते. इतर सुवासिनींना बोलावून पूजा करण्यात येते. रात्री जागर करण्यात येतो. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात. ‘लाट्या बाई लाट्या, फू बाई फू, गठुडं केलं गठुडं..’ अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगतो. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते.

श्रावणातील प्रमुख सण
श्रावण सोमवार आरंभ १ ऑगस्ट
मंगळागौर व्रत आरंभ २ ऑगस्ट
नागपंचमी २ ऑगस्ट
रक्षाबंधन ११ ऑगस्ट
संकष्टी चतुर्थी १५ ऑगस्ट
कृष्ण जन्माष्टम १८ ऑगस्ट
पोळा २६ ऑगस्ट

बातम्या आणखी आहेत...