आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्‍ह्यात श्रावणसरी सुरूच:मध्य प्रकल्प ओव्हरफ्लो; 75 हजार 838 हेक्टर क्षेत्रावरील कोरवाहू पिकांचे नुकसान

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवस पावसाची रिपरिप सुरूच असून, नदी-नाले व प्रकल्प भरले आहेत. पावसामुळे शेतीच्या कामांना ब्रेक बसला आहे. सततच्या पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मध्यम व लघू प्रकल्प भरले असून, काटेपूर्णा आणि वान या दोन प्रकल्पांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

शेतीचे काम रखडले

जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतीच्या कामाचा मार्ग मोकळा झाल होता. मात्र गत काही दिवसांपासून अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली. पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटणार असून, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगरही वाढणार आहे. त्यामुळे यानुकसानाचेही तातडीने पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सरासरीच्या तुलनेत 107 टक्के पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 107.3 टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे आणखी सहा आठवडे शिल्लक आहेत. सर्वाधिक पाऊस 139.7 टक्के बाळापूर तालुक्यात नोंदवण्यात आहे. गेला अकोला तालुका- 117.9 टक्के , तेल्हारा तालुक्यात 116. टक्के, बार्शीटाकळी तालुक्यात 105.7 टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारी पुढीलप्रमाणे पाऊस (मि.मी.) नोंदवण्यात आला.

असा पडला पाऊस

अकोट 8.8

तेल्हारा 13.0

बाळापूर 16.1

पातूर 22.7

अकोला 10.5

बार्शीटकाळी 18.7

मूर्तिजापूर 15.7

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करीत तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले पदाधिकाऱ्यांनी चोहट्टा, देवर्डा, टाकळी बु. टाकळी खु., पारोळा व दापुरा भागाची पाहणी केली. सरसकट सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊन त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्यात असे झाले नुकसान

अतिवृष्टीमुळे जून व जुलै महिन्यात 77 हजार 747 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 75 हजार 838 हेक्टर क्षेत्रावरील कोरवाहू पिकांचे नुकसान झाले. बागायती क्षेत्रातील 101 हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाल. 82.75 हेक्टर क्षेत्रातील फळांची हानी झाली, अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे 1 हजार 724 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे 88 हजार 868 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...