आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:बापाचे कर्ज पाहून केली होती श्रेयसने आत्महत्या, बारावीत झाला उत्तीर्ण

दिलीप ब्राह्मणे | अकोला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रेयस धांडे - Divya Marathi
श्रेयस धांडे
  • ‘पास झाला राजे हाे माह्या पोरगा’ असे म्हणताना वडिलांचे अश्रू थांबत नव्हते

शिक्षणासाेबतच घरातील सर्वच कामे करणारा श्रेयस. मात्र, बापावरील कर्जाचा डाेंगर पाहून ताे खचला अन् १८ मे राेजी त्यानं स्वत:ला संपवलं. गुरुवारी त्याचा १२ वीचा निकाला लागला. माय-बापानं निकाल पाहिला अन् दिवसभर ते रडत होते. वडिलांना तर ‘पास झाला राजे हाे माह्या पोरगा’ असे म्हणताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.

दिनेश धांडेंना (आसेगाव, ता. अकोट) तीन मुलं. त्यात श्रेयस माेठा. कमी वयात वडिलांचे सर्व व्यवहार श्रेयसच हाताळत होता. सोबतच शेतात काम करून बारावीचे शिक्षण घेत होता. परीक्षा दिल्यानंतर मी पास हाेणारच, असे ताे बाेलूनही दाखवत हाेता. मात्र, १८ मे त्याच्या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. घरात डोक्यावरील कर्जाच्या डोंगराबाबत चिंता असायची. ती चिंता श्रेयसला आतून कायम अस्वस्थ करायची.

१८ मे रोजी श्रेयस शेतात गेला आणि विषाची बॉटल तोंडाला लावली. सात दिवस दवाखान्यात श्रेयस मृत्यूशी झुंज देत होता. २५ तारखेला श्रेयस सर्वांना साेडून गेला हाेता. तेव्हापासून धांडे कुटुंबाला अन्न गोड लागत नाही. आज बारावीच्या निकालाचा दिवस उजाडला. गावात त्याचे मित्र निकालाची चर्चा करू लागले. श्रेयसच्या वडिलांनी श्रेयसचा निकाल पाहिला. तो पास झाल्याचे दिसताच ते धायमोकलून रडू लागले. दिवसभर श्रेयसचे आई-वडील व भावंडांच्या डोळ्यात अश्रू होते. विशेष म्हणजे शेजारी सहा-सात पोरांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र त्यातील तिघेच पास झाले.

बातम्या आणखी आहेत...