आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचा खोळंबा:मनमाड - दौंड सेक्शन कामासाठी गाड्यांच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल; 7- 22 ऑक्टोबर दरम्यान रेल्वे सेवा प्रभावित

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

मनमाड - दौंड सेक्शनमध्ये डबल लाईन नॉन - इंटर लॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार आहे. यामार्गावर 7 ते 22 ऑक्टोबर दरम्यानच्या 32 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक 5 गाड्या रिशेड्युल व 9 गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे.

रिशेड्युल करण्यात आलेल्या गाड्या

 • 22845 पुणे - ठवे ज. एक्सप्रेस 12 ऑक्टोबर
 • 22602 साई नगर शिर्डी - मद्रास एक्सप्रेस 7 आणि 14 ऑक्टोबर 22
 • 11077 पुणे - जम्मूतावी झेलम एक्सप्रेस 17 आणि 18 ऑक्टोबर
 • 12129 पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 17 आणि 18 ऑक्टोबर
 • 12221 पुणे - हावडा दुरांतो एक्सप्रेस 17 ऑक्टोबर

या गाड्यांच्या मार्गात बदल

 • 16502 यशवंतपूर - अहमदाबाद एक्सप्रेस गाडी 16 ऑक्टोबर दौंड - पुणे - लोणावळा - वसई - सुरत मार्गे जाईल
 • 22601 मद्रास - साईनगर शिर्डी एक्सप्रेस गाडी 12 ऑक्टोबर रायचूर - विकाराबाद ज. - बिदर - लातूर रोड - परभणी - अंकाई - मनमाड - पुणतांबा मार्गाने जाईल
 • 16217 म्हैसूर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस गाडी 10 आणि 17 ऑक्टोबर रोजी कुर्डुवाडी - लातूर रोड - परभणी - अंकाई - मनमाड - पुणतांबा मार्गाने जाईल.
 • 12103 पुणे - लखनऊ एक्सप्रेस ही गाडी 11 आणि 18 ऑक्टोबर लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल.
 • 12221 पुणे - हावडा दुरंतो एक्सप्रेस ही गाडी 10 ऑक्टोबर रोजी लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल
 • 12147 कोल्हापूर - निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 11 ऑक्टोबर लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल
 • 22131 पुणे - बनारस एक्सप्रेस ही गाडी 10 आणि 17 लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल.
 • 15030 पुणे - गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी 08 आणि 15 ऑक्टोबर रोजी लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल.
 • 15029 गोरखपूर - पुणे एक्सप्रेस ही गाडी 13 ऑक्टोबर लोणावळा - पनवेल - इगतपुरी - मनमाड मार्गाने जाईल.
बातम्या आणखी आहेत...