आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोककळा:चिचपाणी धरणात बुडून बहीण - भावाचा मृत्यू; ह्रदयद्रावक घटनेने डांगरखेडा परिसरात शोककळा

तेल्हारा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट तालुक्यातील डांगरखेडा या आदविासी गावातील चिमुकल्या बहिण भावाचा चिचपाणी धरणात पोहण्यास गेले असता बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार डांगरखेडातील केशवराव बेलसरे हे शेताची कामे पूर्ण करुन रवविारी बाजारपेठत बी- बियाणे खरेदीकरता अकोट येथे गेले होते. दरम्यान त्यांचा नऊ वर्षीय मुलगा युवराज आणि अकरा वर्षीय मुलगी प्रतीक्षा ही दोघे शेजारच्या मुलीसोबत धरणावर पोहायला गेले असता युवराज पाण्यात उतरला. त्याची बहिण प्रतीक्षा व तिची मैत्रिण पाण्याबाहेर होत्या. पोहताना युवराज बुडत असल्याचे प्रतिक्षाने पाहिले असता भावाला वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली. परंतु दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते. हे सारे पाहून प्रतिक्षाची मैत्रिण धावतच गावात मदतीसाठी गेली. परंतु लोकांना येण्यास उशीर झाला आणि या चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोपटखेड येथील पांडूरंग तायडे यांच्या नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या संदर्भात अकोट ग्रामिण पोलिस स्टेशनला माहिती कळवण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर घटनेचा पंचनामा पूर्ण झाला नव्हता. या दुर्दैवी घटनेने डांगरखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...