आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:शिवमहापुराण कथास्थळी‎ चाेऱ्या; दहा महिलांना अटक‎; 32 ग्रॅम साेने जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई‎

बार्शीटाकळी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर राेडवरील म्हैसपूर येथे सुरू‎ असलेल्या शिवमहापुराण कथा, श्रीमद‎ भागवत कथा यज्ञाच्या ठिकाणी महिला‎ चाेरट्यांना पाेलिसांनी अटक केली असून,‎ त्यांच्याकडून ३२ ग्रॅम साेन्याचे दागिने जप्त‎ केले. जेरबंद केलेल्या १० महिलांमध्ये‎ महाराष्ट्रासह अन्य राज्यातील अाराेपींचा‎ समावेश अाहे.‎

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण‎ कथेला शुक्रवार ५ मे राेजी प्रारंभ झाला.‎ शिवमहापुराण कथा श्रवणासाठी राज्यातून‎ लाखोंच्या संख्येने महिला भाविक येत‎ अाहेत. गर्दीचा फायदा घेत महिलांच्या‎ गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या‎ महिलांची टाेळीच सक्रिय झाली असून,‎ बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलांना‎ अटक केली.

त्यात आशा हरीलाल धोबी,‎ मुंज्जू देवी राजू धोबीरा, चंदा सोनू धोबी,‎ अनिता सुरेश धोबी (सर्व रा. रेल्वे स्टेशन‎ जवळ, नागपूर), कमलेश सुरजलाल‎ बावरीया, शशी रीकु बावरीया, कश्मीरा‎ हीरालाल बावरीया (सर्व रा. रंतीत नगर‎ भरतपूर, राजस्थान), प्रिया संदीप उन्हाळे,‎ सुरया राप्रसाद लोंडे (रा. सावंगी मेघे जि.‎ वर्धा) आणि लता किशन सापते (रा.‎ भीमनगर इंदोर, मध्य प्रदेश) यांचा समावेश‎ अाहे. दरम्यान या चाेऱ्यांप्रकरणी पाेलिस‎ पुढील तपास करीत आहेत.‎

चाेरट्यांकडून दागिने जप्त‎

म्हैसपूर येथील शिव महापुराण कथा‎ संपल्यानंतर जेवणासाठी जाणाऱ्या‎ महिलांच्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी‎ चोरी करताना राज्यातील आणि बाहेर‎ राज्यातील एकूण १० महिलांना स्थानिक‎ गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.‎ पाेलिसांनी त्यांची कसून चाैकशी केली.‎ महिला पोलिसांकडून अाराेपींची झडती‎ घेण्यात अाली. त्यात मनी डोरलेचे जोड,‎ दोन मिनी मंगळसूत्र (वजन अंदाजे ३२ ग्रॅम‎ ) आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.‎

तीन महिलांच्या तक्रारी‎

१) बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात शनिवारी ६‎ मे राेजी महिलांनी फिर्याद दिली हाेती.‎ अश्विनी अमित जुनारे (वय २९ रा. शास्त्री‎ नगर, अकोला.) यांनी सोन्याचे एकूण एक‎ लाख वीस हजारांचे दागिने लंपास झाल्याची‎ तक्रार दिली हाेती.‎ २) दुसरी फिर्याद अर्चना दिगांबर देशमुख‎ (रा. नांदुरा, जिल्हा बुलडाणा. ) यांनी दिली‎ हाेती. त्यांचे १७ हजारांचे सोन्याचे दागिने‎ चाेरी झाले. तसेच मानसी अमीत मुरारका‎ (रा. न्यु राधाकिसन प्लाॅट, अकोला. )‎ यांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांची‎ ९० हजारांची मिनी पोत व अन्य सोन्यांचे‎ दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली हाेती.‎