आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे न राबवल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्ह्यातील सहा ग्रामसेवकांना निलंबित केले आहे. एकाच वेळी सहा जणांवर कार्यवाही झाल्याने काम न करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ग्रामीण भागासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फेही काही योजना, उपक्रमही असतात. या योजनांच्या अंमलबजावणीसह कर वसुलीही ग्रामसेवकांद्वारे होत असते. मात्र अनेक योजना, उपक्रमांत काही ग्रामसेवकांकडून हलगर्जीपणा होत असतो. दरम्यान योजना व्यवस्थित न राबवल्याने सहा ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता आढावा ः फेब्रुवारीत जिल्हाधिकाऱ्यांनी योजनांचा आढावा घेतला होता. ग्रामेसवकांकडून माहितीही घेतली. मात्र कारवाई झालेल्या ग्रामसेवकांनी योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे मेच्या शेवटच्या आठवठ्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही ग्रामसेवकांकडे जबाबदारी दिलेल्या योजनांचा आढावा घेतला. यात जलजीवन मिशन, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गतची कामे, रोजगार हमी योजना, आवास योजना, ग्रामपंचायत कर आदींचा समावेश होता. मात्र कामात सुधारणा न झाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.