आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना:काेराेनाचे सहा नवे रुग्ण;  17 जणांना डिस्चार्ज

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १०८ अहवाल आले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चाैघांचा तर खासगी प्रयोगशाळेतून दोन असे एकूण सहा जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला.१७ जणांना डिस्चार्ज दिला.

आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चाैघांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिलाचा समावेश आहे. हे रुग्ण मूर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एक तर उर्वरित दोन रुग्ण मनपा क्षेत्रातील आहे. खासगी लॅब मधून दोन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५,७४५ आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४९ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...