आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेच्या सूचना:सहा जणांचे अहवाल गोवर पॉझिटिव्ह

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या विविध भागात गोवर पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतानाच अकोला जिल्ह्यातही अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. यापूर्वी एक डिसेंबरला दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा सहा बालकांचे अहवाल गोवरसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. १८ नोव्हेंबरपर्यंत पाठवलेल्या नमुन्यांमधील काही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित सहा रुग्णांनी गोवरवर मात केली असून, ते रिकव्हर झाले आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या विविध भागात गोवरचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाचे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

अकोला महानगर पालिका हद्द आणि जिल्ह्याच्या विविध भागात ताप आणि अंगावर पुरळ असणाऱ्या बाल‎ रुग्णांना गोवर संदिग्ध रुग्ण म्हणून‎ गृहित धरून त्यांचे रक्तजल नमुने‎ तपासणीसाठी पुणे आणि मुंबई‎ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत‎ आहेत.

आतापर्यंत ४० हून अधिक‎ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.‎ त्यापैकी ऑक्टोबर, १८‎ नोव्हेंबरपर्यंतचे अहवाल आले .‎ यात ६ अहवाल गोवर पॉझिटिव्ह‎ आले . संबंधित रुग्ण मनपा हद्दीतील‎ रहिवासी आहेत. त्यामुळे‎ आतापर्यंतच्या बाधित अहवालांची‎ संख्या ही १२ झाल्याची माहिती‎ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.‎

लसीकरण करून घ्या
गोवरची पहिली आणि दुसरी लस ज्या बालकांची राहून गेली आहे. त्यांचे लसीकरण पालकांनी करून घ्यावे. याशिवाय ज्या बालकांचे व्हिटॅमिन ए चे डोस घेणे बाकी असतील त्यांनी हे डोसेस घ्यावे. जेणेकरून बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाला तरी गंभीर लक्षणे निर्माण होणार नाही. व्हिटॅमिन ए चा डोस हा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. डॉ. अनुप चौधरी,बालरोगतज्ज्ञ, मनपा.

वयोगट ३ ते ६ वर्ष
पॉझिटिव्ह अहवाल आढळलेल्या सहा रुग्णांनी गोवरवर मात केली असून, त्यांचे वय हे ३ ते ६ वर्ष या दरम्यान आहे. अकोला मनपासह जिल्ह्याच्या विविध भागात ताप आणि पुरळसारखी लक्षणे बाल रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ल्यानुसार तपासणी करावी व उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...