आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरुड तालुक्यातील जरुड येथे असलेल्या एसबीआयच्या एमटीएममध्ये गॅस कटरचा वापर करुन शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास मशिन कापली. यावेळी मशिनमध्ये असलेली १६ लाख ४५ हजार ५०० रुपयांची रोख लंपास करण्यात आली. ही चोरी चोरट्यांनी अवघ्या ८ मिनिटात केली आहे. गॅस कटरचा वापर करुन एटीएममधील रोख उडवण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच एटीएमच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जरुड येथे विलास देवराळे यांच्या जागेतील खोलीत एसबीआयने एटीएम लावले आहे. या एमटीएममध्ये कॅश टाकण्याचे तसेच देखभालीचे काम बँकेने एका खासगी कंपनीला दिले आहेत.
दरम्यान, गुरुवारी (दि. ११) दुपारी ३ वाजेच्या सुमारास यार एमटीएममध्ये १७ लाख रुपये कॅश टाकण्यात आली होती. दरम्यान मध्यरात्री २ वाजून ५६ मिनिटांच्या आसपास चेहऱ्याला रुमाल बांधून दोन चोरटे एमटीएममध्ये आले. त्यावेळी एका चोरट्याने एमटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही वर काळा स्प्रे मारला, त्यानंतर दोघांनी गॅस कटरच्या मदतीने अवघ्या ५ ते ६ मिनिटांमध्ये एमटीएममध्ये ज्याठिकाणी रोख राहते, तो भाग कटरने तोडला आणि त्यामधील १६ लाख ४५ हजारांची रोख घेऊन लाल रंगाच्या कारने पोबारा केला. दरम्यान, चोरी होत असतानाच ही माहिती एटीएम कंपनीच्या मुंबईस्थित मुख्य कार्यालयाला मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती या परिसराचे चॅनेल मॅनेजर पवन भोकरे यांना दिली.
पाच पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू
जरुड येथे तिन चोरट्यांनी अवघ्या आठ मिनीटात एटीएम कापून रोख लंपास केली आहे. हे चोरटे परप्रांतीय असून ते मध्य प्रदेशच्या दिशेने पळाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे एक पथक मध्य प्रदेशच्या दिशेने तपासात रवाना केले असून, उर्वरित चार पथके त्याच कामात आहे. -तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक. स्थानिक गुन्हे शाखा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.