आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंशाच्या मासाची विक्री:गोवशांची कत्तल, तीन क्विंटल गोमांस जप्त

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गोवंशाच्या मासाची विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी तीन क्वींटल गोवंश मांस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली.

पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना माहिती मिळाली की, तीन ऑटो खदान कडून लक्झरी बसस्टॅण्ड मार्गे सिटी कोतवालीकडे जात आहेत. या ऑटोमध्ये गोवंश मांस आहे. ते विक्री करीता घेऊन जात आहेत. अशा माहितीवरून पोलिसांनी सरकारी बगीचा समोर नाकाबंदी केली. यावेळी त्यांना अनिकट चौक कडून एका मागे एक तीन ऑटो येताना दिसले. एमएच ३० बीसी २९४८ क्रमांकाचा ऑटो थांबवून पोलिसांनी चालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव शे. युनूस शे. मोहम्मद वय ३८ रा. महेमूद नगर अकोट फैल असे सांगितले. तर मागे भरलेली पोतडी घेऊन बसलेल्या व्यक्तीने आपले नाव इम्रान अहेमद शे. हयात रा. खिडकी पुरा अकोला असे सांगितले,

त्यानंतर पोलिसांनी एमएच ३० एए ६३७४ क्रमांकाचा दुसरा ऑटो थांबवला. या ऑटो चालकाने त्याचे नाव मो. सुफियान अ. सलीम, तर मागे भरलेली पोतडी घेऊन बसलेला इसम त्याने आपला नाव मो. रुमान अ. सलीम रा. खिडकी पुरा अकोला असे सांगितले. त्यानंतर एमएच ३० बीसी १७९३ क्रमांकाच्या ऑटोला थांबवले असता चालकाने त्याचे नाव मो. इम्रान मो.रफिक रा. कच्छी मजिद जवळ मोहम्मद अली रोड अकोला असे सांगितले.

पोलिसांना तिन्ही ऑटोमधील पोतड्यामध्ये गोवंशमास दिसून आले. अंदाजे ६० हजार रूपये किमतीचे मांस होते. पोलिसांनी तिन्ही ऑटो व गोवंशमांस असे मिळून पाच लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.तिन्ही आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण कायदा अधिनियम कायदा ५,५(क ), सह कलम ४२९, ३४ भांदवी अन्वये सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...