आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णासह तीनही मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरुच:लघु प्रकल्पही तुडूंब; नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पासह तीनही मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरुच आहे. दरम्यान लघु प्रकल्प अद्यापही ओसंडून वाहात आहे. परिणामी प्रशासनाने नदी-नाल्या काठची गावे तसेच वस्त्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान या दोन्ही मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे आता पर्यंत वारंवार उघडावे लागले आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे 31 जुलै रोजी यावर्षी पहिल्यांदा उघडावे लागले होते. तर वान प्रकल्पाचे त्यापूर्वीच उघडण्यात आले होते. दोन्ही प्रकल्पाचे सर्वच्या सर्व दरवाजे आता पर्यंत उघडल्या गेले. नियमानुसार काटेपूर्णा प्रकल्पात 31 ऑगस्ट पर्यंत साठवण क्षमतेच्या 95 टक्के जलसाठा ठेवता येतो. 95 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाल्यास प्रकल्पातील आवक पाहून दरवाजे उघडले जातात. काटेपूर्णा प्रकल्पात 20 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता 95 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले. यातून 50.16 घनमिटर प्रतिसेकंद (50 हजार 160 प्रतिसेंकद) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तुर्तास प्रकल्पात 95.70 टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाचा जलसाठा जो पर्यंत 95 टक्क्यांवर येत नाही, तो पर्यंत प्रकल्पाचे दरवाजे उघडे ठेवले जाणार आहे. तसेच पाण्याची आवक वाढल्यास प्रकल्पाचे दोन पेक्षा अधिक दरवाजे उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दरम्यान पातूर तालुक्यातील मोर्णा, निर्गुणा,मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प तसेच जिल्ह्यातील 20 लघु प्रकल्पातून मोठ्या विसर्ग सुरु आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी सर्वाधिक विसर्ग उमा प्रकल्पातून

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांना दरवाजे नाहीत. सर्वाधिक विसर्ग उमा प्रकल्पातून सुरु आहे. उमा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 10 सेंटीमिटरने विसर्ग सुरु असून 21.57 घनमिटर प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात सोडले जात आहे.

प्रकल्पातील विसर्ग असा

प्रकल्प -- घनमिटर प्रतिसेकंद - लिटर प्रतिसेकंद

- काटेपूर्णा -- 50.16 - 50 हजार 160

- मोर्णा -- 18.34 - - 18 हजार 340

- निर्गुणा - 2.34 - - 2 हजार 340

- उमा - 21.57 - - 21 हजार 570

बातम्या आणखी आहेत...