आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हात कष्टाचे काम, दुचाकीवरील प्रवास किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उन्हाचा फटका बसतो. मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, घाम येणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे आदी लक्षणे आढळतात. असे उन लागल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी विविध पारंपरिक उपचार पद्धती विदर्भात लोकप्रिय आहेत. या उपचार पद्धतीची उपयोगीता, परिणामकारकता आदीबाबत आयुर्वेद तज्ज्ञ माहिती देतात.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात पारा ४० अंशांच्या पुढे जातो. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, वाहनचालकांना अनेकदा उन्हाचा फटका बसतो. त्यावर लक्षणांच्या आधारावर घरच्या घरी लोक उपचार करतात. तळहात आणि तळपायांना भिजवलेल्या काळ्या चिक्कन मातीचा लेप लावणे, कांद्याचा रस हात, पाय, डोकं आणि पोटावर लावणे, नाभीभोवती चुना लावणे आदी विविध उपाय आजही ग्रामीण भागात लोक करतात. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठीचे पारंपरिक उपाय हे प्रभावी असले तरी निव्वळ या उपायांवर अवलंबून न राहता उष्माघाताशी संबंधित लक्षणे असल्यास वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा ठरतो, असेही डॉक्टर सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.