आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Solar Work Completed, Implementation Stalled No Net Metering Work Despite Giving Letter Of Consent To MEDA For Additional Cost; 18 Lakhs Per Month

सौरऊर्जचे काम पूर्ण, कार्यान्वयन रखडले:आगाऊ खर्चाचे संमतीपत्र देऊनही नेट मीटरींगचे काम नाही; महिन्याला 18 लाखांचा फटका

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सौरऊर्जा कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास सहमती असल्याचे पत्र महापालिकेने मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) ला देऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. अद्याप नेट मिटरींगच्या कामास सुरूवात झाली नाही. त्यामुळे महापालिकेला महिन्याकाठी 18 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. 1400 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी 990 केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला.

मेडा ने हे काम भेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेटमिटरींगचे काम न झाल्याने कार्यान्वयन रखडले होते. दरम्यान महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प रोहित्रातील वाढीव दुरुस्ती (उपकरण बदलणे) खर्चात वाढ झाल्याने या खर्चाच्या सहमतीचे पत्र मेडाने महापालिकेस मागीतले. महापालिकेने मेडा ला सहमती पत्र पाठवले. पत्र पाठवुन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही नेट मिटरींगचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दुरुस्तीच्या खर्चापैकी 36 लाख भरले

महापालिकेने दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 36 लाख रुपयाचा भरणा केला आहे. मात्र खर्चात वाढ होवून हा खर्च 75 लाख रुपये होईल. यामुळेच वाढीव खर्चाबाबतचे सहमती पत्र मेडाने मागवले होते.

आतापर्यंत दीड कोटींचे नुकसान

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 15 लाखांचे तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्रातील 3 लाख रुपयाचे विद्युत देयकाचा भरणा मनपाला करावा लागत आहे. डिसेंबर मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर जानेवारी महिन्यात नेट मिटरींगचे काम होणे अपेक्षित होते. प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने आता पर्यंत महापालिकेला एक कोटी 44 लाख रुपयाचा चुना मेडामुळे लागला आहे.

खर्च पुन्हा तपासण्याच्या सुचना

सौर ऊर्जेचे काम करणाऱ्या भेल कंपनीने रोहित्र दुरुस्तीसाठीचा दिलेला 75 लाख रुपयाचा खर्च अधिक वाटत आहे. त्यामुळे भेल कंपनीला खर्च पुन्हा तपासण्याच्या सुचना दिल्या आहेत. भेल कडून खर्च कमी झाल्याचा अहवाल आल्या नंतर नेटमिटरींगचे काम सुरु होईल. - प्रफुल्ल तायडे, विभागीय महाव्यवस्थापक, मेडा

बातम्या आणखी आहेत...