आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना त्रास‎:कोपरगाव ते कान्हेगाव ब्लॉकमुळे‎ काही गाड्या रद्द; प्रवाशांना त्रास‎

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव ते कान्हेगाव‎ दरम्यान २३ जानेवारीपर्यंतच्या‎ ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द केल्या‎ आहेत. तर काही गाड्या सोलापूर‎ विभागातील कोपरगाव यार्डच्या‎ दुहेरी मार्गाच्या कामासाठी वळवल्या‎ आहेत.‎ यात गाडी क्र. ११०३९ कोल्हापूर -‎ गोंदिया एक्सप्रेस २१, २२ ‎, २३‎ कोल्हापूरहून सुटणारी गाडी, गाडी‎ क्र. ०१३३६ गोंदिया - कोल्हापूर‎ एक्सप्रेस २१, २२, २३ गोंदियाहून‎ सुटणारी ट्रेन रद्द केली आहे. गाडी‎ क्र. २२१४१ पुणे-नागपूर १९‎ जानेवारीला सुटणारी गाडी‎ लोणावळा, पनवेल, कल्याण‎ इगतपुरी, मनमाड मार्गे लखनौला‎ जाईल. ट्रेन क्रमांक २२१४२‎ नागपूर-पुणे २० जानेवारी रोजी‎ सुटणारी ट्रेन मनमाड, इगतपुरी,‎ कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे‎ पुण्याला जाईल.‎

गाडी क्र. २२१३९ पुणे-अजनी २१‎ जानेवारीला सुटणारी ट्रेन‎ लोणावळा, पनवेल, कल्याण,‎ इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला‎ जाईल, गाडी क्रमांक २२१४० अजनी‎ - पुणे २२ जानेवारी रोजी सुटणारी‎ गाडी मनमाड, इगतपुरी, कल्याण,‎ पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला‎ जाईल. गाडी क्र. २२११७ पुणे -‎ अमरावती १८ जानेवारी रोजी‎ सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल,‎ कल्याण, इगतपुरी, मनमाड, मार्गे‎ अमरावतीला जाईल. गाडी क्र.‎ २२११८ पुणे - अमरावती १९‎ जानेवारीला सुटणारी गाडी मनमाड,‎ लोणावळा, पनवेल, कल्याण,‎ इगतपुरी मार्गे पुण्याला जाईल.

गाडी‎ क्र. २२१२३ पुणे-अजनी २०‎ जानेवारीला सुटणारी गाडी‎ लोणावळा, पनवेल, कल्याण,‎ इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला‎ जाईल. गाडी क्रमांक २२१२४‎ अजनी-पुणे २४ जानेवारीला‎ सुटणारी गाडी मनमाड, इगतपुरी,‎ कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे‎ पुण्याला जाईल.‎

बातम्या आणखी आहेत...