आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह:सोयाबीन 1995, तुरीची 3741 क्विंटल आवक‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला कृषी उत्पन्न बाजार‎ समितीमध्ये सद्यस्थितीत तूर आणि‎ सोयाबीनची आवक मोठ्या‎ प्रमाणात होत आहे. शुक्रवारी, ३‎ फेब्रुवारीला दुपारपर्यंत १ हजार ९१५‎ क्विंटल तुरीची आवक झाली तर‎ दुपारपर्यंत ३ हजार ७४१ क्विंटल‎ सोयाबीनची बाजार समितीमध्ये‎ आवक झाली आहे. सोयाबीनला‎ शुक्रवारी कमीत कमी भाव ४‎ हजार रुपये, जास्तीत जास्त भाव ५‎ हजार २०० रुपये तर सरासरी भाव‎ ५ हजार रुपये मिळाला आहे.‎ तुरीला कमीत कमी ६ हजार रुपये,‎ जास्तीत जास्त ७ हजार ७३० रुपये‎ तर सरासरी ७ हजार रुपये‎ प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.‎ जिल्ह्यातील खरीपाची शेती‎ करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांकडे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विक्रीसाठी सध्या तूर, सोयाबीन‎ आणि कापूस हे तीन प्रमुख पिके‎ आहेत.

यातून अनेकांनी गरजेपोटी‎ सोयाबीनची विक्री केली आहे.‎ मात्र मोठ्या शेतकऱ्यांनी‎ भाववाढीच्या प्रतिक्षेत सोयाबीन‎ राखून ठेवले होते ते शेतकरी‎ देखिल आता विक्रीसाठी माल‎ बाजारात आणत आहेत. गेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षी प्रमाणे यंदाही १० ते १२‎ हजारांवर कापसाला भाव मिळेल‎ या अपेक्षेत शेतकरी आहेत. मात्र‎ यातही समाधानकारक सुधारणा‎ नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह‎ आहे. सध्या नव्याने तूर तयार‎ झाली असून गरजेपोटी मिळेल त्या‎ भावात शेतकरी बाजारात विक्री‎ करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...