आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात धुव्वाधार पाऊस:मेघगर्जना, विजांच्या लखलखाटांसह पडल्या तुरळक गारा; तालुक्यात 103.7 मिमी पाऊस

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहर परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात रविवार 19 जून रोजी सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. सुमारे एक मिनीट शहर परिसरात तुरळक ठिकाणी बारिक गारांसह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून हुलकावणी देणारे ढग अखेर सायंकाळी पावणेसहानंतर बरसले, त्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.

अनेक भागात साचले पाणी

जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती. दुपारी 3 नंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारात मेघगर्जना आणि विजांच्या लखलखाटात पावसाला सुरुवात झाली. शहरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान आठवड्याभरापासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने उन्हाची तिव्रता कमी झाली आहे. परिणामी तापमानात घट होऊन जिल्ह्यातील कमान तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. उन्ह कमी झाले असले तरी दोन दिवसांपासून उकाडा जाणवत होता.

अकोल्यावर आभाळमाया

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 64.0 मिलीमिटर पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा एकट्या अकोल्या तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत 103.7 मिलीमीटर पावसाची नोंद अकोल्यात झाली आहे. रविवारच्या पावसाची त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.

प्रचंड मेघगर्जना

सायंकाळी 6 वाजून 5 मिनीटांच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला होता. त्यानंतर शहरात प्रचंड मेघगर्जना आणि विजांचा लखलखाटाला सुरुवात झाली. या दरम्यान बाजार परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला असलेली प्रतिष्ठाने व व्यावसायिक सदनिकांचा आसरा घेतला होता. पुन्हा 6.10 च्या दरम्यान पावसाचा जोर वाढला.

बातम्या आणखी आहेत...