आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना मोठा दिलासा:मध्य रेल्वेने दिली विशेष गाड्यांना मुदतवाढ, उद्यापासून आरक्षण होणार सुरू

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई - बलिया, गोरखपूर दरम्यान आधीच चालणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांचा समावेश

1. मुंबई - बलिया त्रि-साप्ताहिक विशेष ( 26 फेऱ्या)

01025 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 जुलै ते 29 जुलै (13 फेऱ्या) दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 14.15 वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी 01.45 वाजता पोहचेल.

2. 01026 विशेष बलिया येथून 3 जुलै ते 31 जुलै (13 फेऱ्या) पर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी 15.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल. या विशेष ट्रेनचे थांबे आणि संरचना यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

3. मुंबई - गोरखपूर आठवड्यातून 4 वेळा विशेष (36 फेऱ्या)

01027 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 2 जुलै ते 31 जुलै (18 फेऱ्या ) दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी 14.15 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी 02.45 वाजता पोहोचेल.

4. 01028 विशेष गोरखपूर येथून 4 जुलै ते 2 ऑगस्ट (18 फेऱ्या) दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 14.25 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांमध्ये (बेलथरा रोडवरील एक जोडलेले वगळता) आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही.

येथे करा बुकिंग

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01025 आणि 01027 साठी विशेष शुल्कासह बुकिंग गुरुवार, 24 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होत आहे.

बातम्या आणखी आहेत...