आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे महानगरात आगमन होत असून,त्याची जय्यततयारीशक्तिधामसेवा समिती वआर्ट ऑफलिव्हिंगच्या वतीने जोमाने सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शक्तिधाम सेवा समितीचे अध्यक्ष आमदार वसंत खंडेलवाल यांनी दिली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. शक्तिधाम सेवा समितीचे सेवाधारी, ज्येष्ठ उद्योजक सुशीलकुमार खोवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हरीश लाखानी, कपिल ठक्कर, रामकृष्ण दालमिया आदी मान्यवर उपस्थित होते. येथील गीता नगर परिसरात निर्माणाधिन शक्तीधाम वास्तूचे निर्माण कार्य सुरू असून, महानगरात या माध्यमातून एक भव्य दिव्य वास्तू साकारत आहे. ही भव्य वास्तू शक्तिधाम सेवा समितीच्या अंतर्गत संचालित होत आहे.
या वास्तूच्या मुख्य गर्भगृहाचा शिलान्यास सोमवारी २७ फेब्रुवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होत आहे. वास्तू शिलान्यासच्या सोहळ्यानंतर सायंकाळी ६ वाजता गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षणच्या एकविरा मैदानात महासत्संग भक्तीपर्व आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये गुरुदेव हजारो नागरिक, महिला, पुरुषांना संबोधित करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सोमवारी २७ फेब्रुवारी श्री श्री रविशंकर यांचे १२.३० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर १ वाजता गीता नगर येथील शक्तीधाम वास्तूच्या गर्भगृहाचा शिलान्यास सोहळा होणार आहे. मंगळवारी २८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता गुरुदेव हे खंडेलवाल भवन येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
त्यानंतर सकाळी १० वाजता खंडेलवाल भवन येथील कार्यक्रम आटाेपून गुरुदेव शिवनी विमानतळाकडे कूच करून नाशिककडे प्रयाण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.