आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा दिन:स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये  क्रीडा दिन उत्साहात साजरा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व भारतीय हॉकी संघातील जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे अशा महान हॉकीपटूची विद्यार्थ्यांना ओळख व माहिती मिळावी या करिता स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळा बिर्ला कॉलनी येथे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दीक्षित यांच्या मार्गदर्शनात क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आरएलटी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. राजेश चंद्रवंशी यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दीक्षित होत्या. यावेळी डॉ. राजेश चंद्रवंशी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळाचे महत्व, वेळेचे नियोजन कसे करावे तसेच इतर खेळांविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता शाळेचे क्रीडा प्रमुख स्वप्निल अंभोरे व क्रीडा शिक्षिका वैष्णवी निकोरे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...