आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावाची मागणी:क्रीडा क्षेत्राला मिळणार चालना ;  ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव देण्याच्या सूचना

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी तसेच ग्रामीण व शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत, क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्याकरीता २०२२-२३ व २०२३-२४ वर्षाकरीता सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व ओटीएसपी क्षेत्राअंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव इच्छुक संस्थांनी ५ सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला येथे अर्ज सादर करावयाचा आहे.

या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २०० किंवा ४०० मीटरचा धवनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे किंवा तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडासाहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रींडागणांवर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे आदींसाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय क्रीडांगणावर मातीचा किंवा सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे. क्रीडांगणाभोवती डेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवुन मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी हॅन्ड मिनी लोअर खरेदी करणे इत्यादी बाबींकरीता अनुदान मंजूर करण्यात येते.

स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, कंन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्यायविभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकशाळा किंवा आश्रमशाळा व वसतीगृह, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या व शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून पाच वर्ष पुर्ण झालेले शाळा, व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील.

बातम्या आणखी आहेत...