आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू पांढऱ्या पायाची:विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुला मुलबाळ होत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस, तू मेल्यावर दुसरी बायको करता येईल, असे हीनवून व टोमणे मारून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू-सासऱ्यांविरूद्ध अकोट फैल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाखोंडा खूर्द माहेर असलेल्या भुसावळ येथील दीपनगर सासर असलेल्या विवाहितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात म्हटले की, दीपनगर येथील खुशाल दुर्योधन झासकर याच्याशी १३ जून २०१५ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून त्रास देणे सुरू केले व कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण करत असत.

लग्न झाल्यानंतर दोन वर्ष मुलबाळ झाले नसल्याने पती, सासू, सासरे टोमणे मारायचे की तू वांझोटी आहेस. तुला बाळ होणार नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस. तुझ्यासोबत लग्न लावून आम्ही फसलो. नणंदही दोन दोन महिन्यांनी यायची व पतीचे कान भरून द्यायची. त्यानंतर पती, सासू व सासरे टोमणे मारायचे व भांडण करून तू मेल्यावर दुसरे लग्न लावून देऊ, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करायचे. त्यानंतर त्यांनी घरातून हाकलून दिले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी खुशाल दुर्योधन झासकर, शोभा दुर्योधन झासकर, दुर्योधन काशीराम झासकर व दीपाली भारत सावळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...