आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनासाठी एसटीची विशेष सेवा:अकोल्यातून चिखलदऱ्याला जाणाऱ्या पर्यटकांची सोय, 1 ऑगस्टपासून सुरुवात

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. अशात पर्यटनाला नागरिक पसंती देतात. अकोल्यामधून या काळात थंड हवेचे ठिकाणं चिखलदरा येथे जाणाऱ्यांची प्रचंड संख्या असते. ही बाब लक्षात घेत अकोला एसटी प्रशासनाच्यावतीने चिखलदऱ्यासाठी १ ऑगस्टपासून विशेष सेवा सुरू केली आहे. अकोला विभागातून अकोट आगारातून सुटणारी ही बस अकोला येथून होत चिखलदरा पोहचणार आहे. येथे मुक्कामानंतर सकाळी बस परतीसाठी निघेल.

अशी असेल सेवा

चिखलदऱ्यासाठी अकोट आगारातून दुपारी १२.४५ वाजता सुटेल. ही बस दुपारी १.४५ ला अकोला पोहचेल, त्यानंतर २ वाजता अकोल्यावरून चिखलदऱ्यासाठी निघेल. सायंकाळी ५.३० ला चिखलदरा बस पोहचेल. रात्रभर बस चिखलदरा येथे मुक्कामी असेल. सकाळी हिच बस ६.३० वाजता अकोला परतीसाठी निघेल. ती अकोल्याला सकाळी १० ला पोहचेल. अकोल्यावरून बस ११.१५ वाजता अकोट पोहचेल.

उत्सवानिमित्त सोय

श्रावण महिन्यामध्ये उत्सवांची गर्दी असते. नागपंचमी, रक्षाबंधन, १५ ऑगस्ट, कृष्ण जन्माष्टमी, पोळा अशा दिवसांना चिखलदरा जाणाऱ्यांची संख्य प्रचंड असते. अशात प्रवाशांसाठी ही सेवा सोयीची ठरणार आहे. एक दिवसाचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी याच बसने परत येता येणार आहे.

प्रतिसाद बघून फेऱ्यात वाढ

चिखलदऱ्यासाठी सध्या एकच बस लावण्यात आली आहे. माऋ, प्रवाशांचा प्रतिसाद बघता पुढे बस वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य म्हणजे अकोट येथून बस येणार असल्याने येथील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच चिखलधऱ्यावरून अकोला येथे विविध कामासाठी येणाऱ्यांना याचा चांगला लाभ घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...