आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ:गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; 15 पर्यंत अर्ज मागवले‎

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील चर्मोद्योग‎ व्यवसाय करणाऱ्या गटई‎ कामगांराना १०० टक्के अनुदानावर‎ पत्र्यांचे स्टॉल वाटप करण्यासाठी‎ बुधवार १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज‎ मागवले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी‎ योजनेचा लाभ घ्यावा,असे‎ आवाहन समाज कल्याणचे‎ सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता‎ राठोड यांनी केले. अर्जदाराच्या‎ कुटूंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी‎ ४० हजार, शहरी भागासाठी ५०‎ हजारापेक्षा अधिक नसावे., अर्जदार‎ ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती‎ जागा ग्रा.म., न.पा., छावणी बोर्ड,‎ महापालिका यांनी त्यास भाडयाने,‎ कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु‎ अधिकृतरित्या ताब्यात दिलेली‎ असावी किंवा त्याच्या‎ स्वयंमालकीची असावी. अधिक‎ माहितीसाठी समाज कल्याण‎ कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर‎ सामाजिक न्याय भवन, निमवाडी‎ अकोला येथे संपर्क साधावा.‎

बातम्या आणखी आहेत...