आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:शाळेत मोफत पाठ्यपुस्तक वाटपाला प्रारंभ; 8 लाख 48 हजार प्रती प्राप्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवारी शाळांमध्ये मोफत पाठपुस्तकांच्या वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत जिल्ह्यात सर्व पुस्तकांच्या ८ लाख ४८ हजार ९२२ प्रती शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भौतिक सुविधा, पोषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येते. दरम्यान यंदाही मोफत पाठ्यपुस्तर वितरण योजनेअंतर्गत शिक्षण विभागाला पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३४ शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण होत आहे. घुसर, आपोती, पातूर नंदापूर या केंद्राअंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या वेळी विस्तार अधिकारी शाम राऊत, केंद्र प्रमुख शाम कुलट, कविता ढाकणे, किरण लाटकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...