आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पूर्णा-अकोला रेल्वे अकोटपर्यंत सुरू करा; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले निवेदन

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतिक्षित पुर्णा-अकोला रेल्वे सेवा अकोटपर्यंत सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते विशाल भगत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.

भोकरदन जिल्हा जालना येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पूर्णा-अकोला-अकोट रेल्वे सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.चर्चेअंती अकोटपर्यंत रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांना दिले. भेटी दरम्यान देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अकोला अकोटपर्यंत ब्रॉडगेजचे काम गतवर्षी पूर्ण झाले आहे. अकोटमध्ये सुसज्ज रेल्वे स्थानकाचे उभारणीचे काम सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे.

रेल्वे सुरू करण्यात अडसर ठरत असलेला अकोला नाक्यावरील पूल आता रहदारीस खुला झाला असून, रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बाबीची पळताळणी करून सीआरएस प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित केले आहे. अकोट अकोला रस्ते मार्गाचे पूर्ण होण्याचे स्वप्न सध्या अंधातरी आहे.हे काम नक्की किती वर्षात पूर्णत्वास येईल याबाबत अकोटवासी साशंक आहे. अशावेळी रेल्वे काम पूर्ण झालेले असताना रेल्वे सेवा सुरू करणे गरजेचे आहे.सध्या राज्यात एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत,पर्यायी व्यवस्था नसल्याने निर्यात-आयातीवर परिणाम होत आहेत.पर्यायाने अकोटपर्यंत रेल्वे सेवा सुरू होणे आवश्यक आहे.

याशिवाय शेजारील दोन जिल्ह्यासह आसपासच्या खेड्यात तसेच आदिवासी बहुल भागात रेल्वे सेवा सुरू झाल्यास व्यापाराला चालना मिळणार असल्याने आपल्या कारकिर्दीत ही रेल्वे सुरू करण्याची मागणी निवेदनकर्त्यांनी केली. निवेदन देतेवेळी विशाल भगत, आकाश निंबोळकर,प्रतीक भगत आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून अकोटपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यात ते आग्रही असल्याचे विशाल भगत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...