आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्बेव्हॅक्स लस:बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्स लस वापर सुरू

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्बेव्हॅक्स या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्याबाबत मान्यता मिळाली असून आता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाही याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कॉर्बेव्हॅक्स बूस्टर डोस म्हणून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड लाभार्थ्यांना आधी घेतलेली लसच बुस्टर डोस म्हणून देण्यात येत होती. मात्र आता दोन पैकी कोणतीही लस घेतली असली तरी बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्स लस घेता येणार आहे. या लसीची प्रिकॉशन डोससाठी नोंद कोविन प्रणालीवर करण्यासाठी आवश्यक दुरुस्तीही पोर्टलवर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याकडून जिल्हा आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला गुरुवारी १८ ऑगस्टला पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोलाच्या वतीने गुरुवारी २५ ऑगस्टला जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेला कॉर्बेव्हॅक्स लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी वापर करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

प्रिकॉशन डोस देण्यापूर्वी लाभार्थ्यांनी दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. याशिवाय यापूर्वीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आधी घेतलेल्या लसींचाच बूस्टर डोसही घेता येणार आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कॉर्बेव्हॅक्स या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्याबाबत मान्यता दिली होती.

संमतीपत्राची आवश्यकता नाही
कोविड लसीकरणाअंतर्गत १२ ते १४ व १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करताना पालकांचे संमतीपत्र घेण्याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार १२ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करताना पालकांचे संमतीपत्र घेण्याची आवश्यकता नाही, असे पत्र २६ ऑगस्टला राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्याला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...