आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे आवाहन:आजपासून स्टार्टअप यात्रा; शैक्षणिक संस्थांना देणार भेटी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा बुधवार, १७ ऑगस्टपासून जिल्ह्यात येत आहे. नागरिकांच्या नाविन्यता पूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी यात्रेचा लाभ घेऊन स्टार्टअप योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे १७ ते २० आॅगस्ट या कालावधीत स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येत आहे. यात्रेत मोबाइल व्हॅन सोबत असलेल्या प्रतिनिधीद्वारे नागरिकांना या यात्रेची संपूर्ण मा‍हिती, नविन्यपूर्ण संकल्पना व त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात येणार आहे. याचबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करून यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहिती पुरवण्यात येईल.

अशी हाेईल सुरुवात : स्टार्टअप यात्रा जनजागृती व्हॅन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होईल. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना स्टार्टअप यात्रेच्या प्रयोजनाची माहिती देऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नामांकीत महाविद्यालयांना भेट देऊन नागरिकांना स्टार्टअपबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. बाळापूर व पातूर तालुक्यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालयांना भेटी दिल्या जातील. १८ आॅगस्टला मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालयांना भेट देणार आहे. ही यात्रा २० आॅगस्टला अकोट व तेल्हारा तालुक्यात भेट देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...