आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक:एकपात्री स्पर्धा 17 डिसेेंबरला, नोंदणीला सुरुवात; यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मलकापूर अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला( मराठी विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 17 डिसेंबर रोजी, गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृती राज्यस्तरीय 'गणलक्ष्मी करंडक' राज्यस्तरीय एकपात्री साभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नोंदणीला सुरुवात

स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृतात होणाऱ्या या स्पर्धेची नोंदणी सुरू आहे. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार विजेत्यास 'गणलक्ष्मी करंडक' व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५,५५५ रुपये रोख पारितोषिक प्रदान करून गौरविले जाईल. द्वितीय पुरस्कार व स्मृतिचिन्ह साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ ३, ३३३ रोख, तृतीय पुरस्कार - स्मृतिचिन्ह व वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ २, २२२ रोख, चतुर्थ पुरस्कार व स्मृतिचिन्ह आप्पासाहेब काटे स्मृतिप्रीत्यर्थ १,१११ रोख, पांचवा पुरस्कार व स्मृतिचिन्ह नर्मदाबाई काटे स्मृतिप्रीत्यर्थ १,१११ रोख , सहावा पुरस्कार स्मृतिचिन्ह व १,००१ रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. तसेच १० स्पर्धक संखे मागे असे, दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी ५०१ रोख उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धाकाला प्रदान केले जातील.

प्रत्येक स्पर्धकाला किमान पाच तर कमाल सात मिनिटातच सादरीकरण पूर्ण करता येईल. स्पर्धेची भाषा ही मराठी वा मराठी बोली भाषा असावी. जुन्या-नव्या नाटक, एकांकिका तथा कथा- कादंबरीतील उतारा नसावा. स्वतंत्र संहितेचा प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धकाला किमान दोन पात्रं तरी सादर करावी लागतील. जात, धर्म, पंथ, वंश वा व्यक्तीच्या भावना दुखावणारी संहिता नसावी. स्पर्धेत अश्लीलतेला स्थान नाही. संहितेच्या तीन प्रती आयोजकांकडे जमा कराव्या लागतील. स्पर्धेचा प्रवेश १२ डिसेंबरपर्यंत स्वीकारला जाईल, अधिक माहितीसाठी संयोजक प्रा. मधू जाधव यांच्या 7020805007/9405967505 या क्रमांकावर साधावा, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...