आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मलकापूर - अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला ( मराठी विभाग ) यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवारी १७ डिसेंबर रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृती राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक’ राज्यस्तरीय एकपात्री साभिनय स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित केली आहे. हे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे.
या स्पर्धेत प्रथम पुरस्कार वजिेत्यास ‘गणलक्ष्मी करंडक ‘ व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५,५५५ रुपये रोख पारितोषिक प्रदान करून गौरवले जाईल. द्वितीय पुरस्कार व स्मृतिचिन्ह साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ ३,३३३रोख, तृतीय पुरस्कार - स्मृतिचिन्ह व वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ २,२२२ रोख, चतुर्थ पुरस्कार व स्मृतिचिन्ह आप्पासाहेब काटे स्मृतिप्रीत्यर्थ १,१११ रोख, पाचवा पुरस्कार व स्मृतिचिन्ह नर्मदाबाई काटे स्मृतिप्रीत्यर्थ १,१११ रोख , सहावा पुरस्कार प्रा. शोभा वाकरे स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिचिन्ह व १,००१ रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. तसेच १०स्पर्धक संख्येमागे असे, दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी ५०१ रोख उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रदान केले जातील, अशी माहिती आयाेजकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.