आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच अव्वल:राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण; दहावीच्या परीक्षेत मुलीच अव्वल

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी १७ जूनला ऑनलाइन जाहीर झाला. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुली अव्वल ठरल्या आहेत. अकोल्यातील सहा मुलींनी १०० पैकी १०० टक्के गुणासह उत्तुंग भरारी घेतली.

भारत विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री अविनाश चांदेकर, आर्या सुहास देशपांडे, बाल शिवाजीची स्वरांजली शिरीश कडू, खंडेलवाल ज्ञानमंदिरची भार्गवी कसबेकर, तन्वी आशिष अमिन, सुहानी अजयकुमार गुप्ता यांनी पैकी गुण प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी १७ जूनला जाहीर केला. या निकालानुसार जिल्ह्याचा निकाल ९७.४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून २४ हजार ९७० विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २४ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इयत्ता बारावीच्या परीक्षेपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलीच आघाडीवर आहेत. ९८.२४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९५.९४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक १० हजार ६५ विद्यार्थी अकोला तालुक्यातून तन्वी आशिष-गीताली अमिन ही कोठारी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी आहे.

तिला १०० टक्के मिळाले. तीने संगीताच्या मध्यमा पूर्णपर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिचे वडील व्यावसायिक, आई खासगी शिक्षिका आहेत. शिक्षकांचे सहकार्य, आईच्या मार्गदर्शनात तिने हे यश संपादन केले. तिने अभ्यासासह गायनाची योग्य गुंफण जुंपली. वेळापत्रकानुसार ती अभ्यास करायची. अभ्यासात सातत्य ठेवले.

नृत्य, गायनालाही भरपूर वेळ
Âआर्या देशपांडे
दहावीच्या अभ्यासासाठी दिवसातून दोन ते तीन तास वेळ देता येईल, असे नियोजन केले होते. मला नृत्य, गायनाची आवड आहे. त्यामुळे सरावासाठी वेळ राखून ठेवत असे. अभ्यासातील सातत्य, सराव आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवू शकले. पुढे मला कला आणि शिक्षण क्षेत्रात करियर करायचे आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षा मी देत आहे. या माध्यमातून नृत्य विशारद होणार आहे. दहावीमध्ये कलागुणांचा फायदा झाला आहे.

अभ्यासामध्ये ठेवले सातत्य
Âधनश्री चांदेकर
इयत्ता दहावीतील यशासाठी वेगळे काही करायची गरज भासली नाही. मात्र मी अभ्यासात सातत्य ठेवले होते. शाळेच्या सूचना, मार्गदर्शन, गृहपाठ वेळीच पूर्ण करण्यावर भर होता. पूर्ण विषयांना वेळ कसा देता येईल, असे नियोजन केले होते. पुढे जेईईत उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीत मला करियर करायचे आहे. मला चित्रकला, शास्त्रीय नृत्याची आवड आहे. कथ्थकमध्ये मी पहिल्या पाच परीक्षा दिल्या. या कलागुणांचा फायदा झाला. कलागुणांसह १०० टक्के गुण मिळाले.

आयएएस व्हायचे आहे
Âसुहानी गुप्ता
दहावीची परीक्षा म्हटले की टेंशन होते. त्यात ऑनलाइन वर्गामुळे अभ्यास कसा करायचा, अशी भीती होती. पण वर्ग नियमित केले. शिकवलेल्या अभ्यासाचा सराव केला. दररोज तीन तास अभ्यास करायचे. अभ्यासातील सातत्याने हे यश मिळाल्याचे सुहानी गुप्ता सांगते. ती कोठारी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील व मोठा भाऊ वकील आहे. तिलाही कॉमर्सचे शिक्षण घेऊन वकीलीचे शिक्षण घ्यायचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून आयएएस व्हायचे आहे.

निकालाने दिला सुखद धक्का
Âभार्गवी कसबेकर
भार्गवी अनिल-रेवती कसबेकर खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूलची विद्यार्थिनी आहे. नवव्या वर्गापर्यंत शिकवणी न घेता तिने प्रत्येक वर्गात अव्वल स्थान प्राप्त केले. दहावीत चांगले गुण मिळेल, अशी खात्री होती. पण १०० टक्के निकाल सुखद धक्का देऊन गेल्याचे ती सांगते. तीने बॉलबॅटमिंटनमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली. अॅकरिंग, चित्रकलेत ती पारंगत आहे. भार्गवीला अभियंता बनायचे आहे.
पित्याचा मृत्यू झाला; आईने श्रम करून शिकवलेल्या मुलीला ८५.६० टक्के

प्रतिनिधी गवंडी काम करणाऱ्या पित्याचा दहावीच्या वर्षात काेराेना काळात मृत्यू झाला.आईने न खचता साड्यांना पिकाे-फाॅल लावण्याच्या व्यवसायातून संसाराचा गाडा हाकला.मुलीनेही आईच्या श्रमाची जाणीव ठेवली.अन् दहावीत ८५.६० टक्के गुण मिळवत परिश्रमाने उसवलेले आयुष्य शिवण्याच्या संघर्षातील महत्त्वाचा टप्पा पार केला. तनीशा नंदू गंगाधरे असे या संघर्षयात्री लेकीचे नाव असून, तिची ही जिद्द सर्वांसाठीच प्रेरणादायी अशीच आहे.

वडिलांचे छत्र हरवल्याने परिस्थिती लक्षात घेऊन मोहितने गाठले यश
अकोला
अनेकजण आपण ज्या भागात राहतो, तो भाग यशवंताचा नाही. आपण स्टॅडर्ड एरियात राहत असतो तर आपणही यशवंत झालो असतो, अशी स्वत:ची समजूत करुन घेतात आणि कोणतेही प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात. परंतु आपल्या घरची परिस्थिती कशी आहे? आपण किती प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतोय, आपल्यावर काय ओढवलं आहे? आपल्याला अडचणीत कितीजण मदत करीत आहे, याचे भान ठेवल्यास परिस्थितीवर मात करुन यश संपादन.

प्रामाणिक प्रयत्नांमुळे यश
Âस्वरांजली कडू
भार्गवी कसबेकर
अकोला जिल्ह्याचा निकाल ९७.४ टक्केसुहानी गुप्ता
भारत विद्यालय, बाल शिवाजी शाळा, खंडेलवाल ज्ञानमंदिरच्या विद्यार्थिनींचे यश
तन्वी अमीन
९८.२४ टक्के मुली उत्तीर्ण, ९५.९४ टक्के मुले उत्तीर्ण पैकी
सहा मुलींचे उत्तुंग यश
प्रामाणिक प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते, हे मी ठामपणे सांगू शकते. शाळेतून दिलेला अभ्यास मी वेळीच पूर्ण केला. वेगळे काही करण्याची किंवा नुसतं अभ्यास एके अभ्यास करण्याची गरज भासली नाही. छंद आणि आवड जोपासत प्रत्येक विषयाला योग्य न्याय कसा देता येईल, याचे नियोजन केले होते. मला क्लासिकल म्युझिक आणि चित्रकलेची मला आवड आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबर इतर कलांसाठीही गेल्या वर्षभरात वेळ दिला.

आर्या देशपांडे धनश्री चांदेकर स्वरांजली कडू 100 निकालानंतर बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थिनी. छायाचित्र नीरज भांगे. तनीशा नंदू गंगाधरे आपल्या आईसह. मोहित सुर्वे आपल्या आई समवेत

बातम्या आणखी आहेत...