आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळा:एक लिटरमधील 562 मिलीलिटर पाण्याची सात तासांत वाफ

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाची प्रखरता आणि उष्ण वाऱ्यांमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होत असून, याची पडताळणी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ४४ अंशांच्या तापमानात एक प्रयोग केला. स्टीलचे एक पसरट भांडे उघड्यावर ठेऊन त्यामध्ये एक लिटर पाणी टाकले. सात तासानंतर पुन्हा पाणी मोजले असता तब्बल ५६२ मिली लिटर पाण्याची उन्हाच्या प्रखरतेमुळे वाफ झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात दीड महिन्यांपासून कमाल तापमानाचा पारा ४१ अंशांच्या वर आहे. वाढत्या तापमानामुळे भूजलावर ताण पडून जमिनीतील पाणी पातळी १.४४ मीटरने खाली गेल्याचे भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणेच्या आकडेवारीवरून समोर येते. वाढत्या उन्हामुळे एकीकडे पाण्याच्या मागणीत वाढ होऊन उपसा वाढतो तर दुसरीकडे भूपृष्ठावरील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. तीव्र उन्हामुळे एक लिटरपैकी निम्म्याहून अधिक पाण्याची वाफ होत असल्याने वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात येते.

उन्हाची दाहकता जाणवते
सूर्य किरणे व उष्ण वारा यामुळे तलाव, समुद्र, जमिनीतील ओलावा आणि पाण्याच्या स्त्रोतांमधून बाष्पीभवन होते. तापमान जेवढे अधिक किंवा भूपृष्ठजलाचे आकारमान तेवढे अधिक तेवढा बाष्पीभवनाचा दरही अधिक असतो, असे तज्ज्ञ सांगतात. भांड्यातील पाणी आणि प्रकल्पातील पाणी या दोन्ही संरचना भिन्न असल्या तरी उन्हाची दाहकता या प्रयोगावरून
लक्षात येते.

भूपृष्ठावरील ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन
बाष्पीभवन मोजण्याची एक स्वतंत्र पद्धत असली तरी या प्रयोगावरून अकोल्यातील तीव्र उन्हाचे परिणाम लक्षात येतात. तसेही दर वर्षीच्या तीव्र उन्हामुळे सर्फेस वॉटरला फटका बसत असतो. उन्हाळ्यात ३० ते ३५ टक्के भूपृष्ठावरील पाण्याचे
बाष्पीभवन होते.
प्रवीण बरडे, सहायक भू-वैज्ञानिक, ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. अकोला.

बातम्या आणखी आहेत...