आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Stolen Sand In Anvi's Dalit Road Works; It Has Been Two Days Since The Inquiry Was Ordered By The Collector. However, No Action Has Been Taken Yet | Marathi News

कारवाईला विलंब:अन्वीच्या दलितवस्तीच्या रस्ताकामात चोरीची वाळू; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश, चौकशी होऊन दोन दिवस झाले. मात्र, त्याबाबत अद्याप कारवाई झालेली नाही

बोरगाव मंजू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरगाव मंजू जिल्हापरिषद सर्कलमधील दलित वस्तीच्या रस्त्याच्या कामात चोरीची वाळू वापरल्याची तक्रार राजू खांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी होऊन दोन दिवस झाले. मात्र, त्याबाबत अद्याप कारवाई झालेली नाही.

या संदर्भात त्यांच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू जिल्हा परिषद सर्कलमधील अन्वी गावामध्ये खोट्या दलित वस्त्या निर्माण केल्या. याबाबत चौकशी पूर्ण न करता अधिकाऱ्यांनी दलित वस्तीचा निधी दिला. त्यानुसार ग्रामपंचायतीने भागात कामे सुरू केली. या कामासाठी चोरीचे साहित्य वापरण्यात येत असल्याची तक्रार राजू खांडेकर यांनी ३ मार्चला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे केली होती. याप्रकरणी त्यांनी अकोला तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले.

तहसीलदारांनी मंडळ अधिकारी राऊत, तलाठी गायवाडे, संतोष ठाकूर यांना पाठवून पंचनामा तयार करून अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. परंतु, संबंधितांनी १० ब्रास वाळू रात्रीच रशीद व नीलेश वानखडे यांच्या घरासमोर आणून टाकली, २० ब्रास वाळू वाल्मिकी विद्यालयाजवळ पडलेली दिसली, असे तलाठी यांच्या अहवालात नमूद असून, ४ दिवसांपासून अद्यापपर्यंत महसूल विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान याबाबत प्रशासनाकडे पुन्हा तक्रार करणार असल्याचे उपसरपंच शेक गणी, राजू खांडेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...