आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅफेमधील गैरप्रकार 8 दिवसांत बंद करा:अकोल्यातील शिवसेनेच्या महिला नेत्यांची मागणी; आंदोलनाचा इशारा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅफेंमधील गैरप्रकार आठ दिवसात बंद न झाल्यास शिवसेना स्टाईल छडा शिकविण्यात येईल, असा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे यांनी रविवारी दुपारी आयाेजित पत्रकार परिषदेत दिला.

काही कॅफेंमधून मुली रडतच बाहेर पडत असून, आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. बंद द्वार हाेणाऱ्या प्रकारांना वेळीच राेखणे आवश्यक असून, सर्व ठिकाणी एकाच वेळी कार्यवाही व्हावी, असेही त्या म्हणाल्या.

शिवसेनेच्या महिला नेत्यांची मागणी

अकाेल्यात खासगी काेचिंग क्लासचे जाळे अन्य लगतच्या तुलनेने सर्वाधिक आहे. त्यामुळे अकाेल्यात अन्य जिल्ह्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही, खासगी काेचिंग क्लासच्या परिसरात सर्वाधिक कॅफे आहे. यात अमनाखाॅ प्लाॅट, रणपिसे नगर, राऊत वाडी, शास्त्री नगर, सिव्हिल लाईन्स चाैक परिसराततील काही कॅफेंमध्ये गैरप्रकार चालतात. त्यामुळे हे गैरप्रकार बंद करण्याची मागणी 4 डिसेंबर राेजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या महिला नेत्यांनी केली.

परत्रकार परिषदेत केले वक्तव्य

शासकीय विश्रागृहातील आयाेजित पत्रकार परिषदेला शहर संघटिका तथा माजी नगरसेिवका मंजुषा शेळके, वर्षा पिसाेडे, निलीमा तिजारे, संगिता राठाेड, राखा राऊत, रेखा देशमुख, सिमा माेकळकर, रंजना हरणे, यांच्यासह पूर्वचे प्रमुख अतुल पवानगी, गजानन बाेराळे उपस्थित हाेते.

काय म्हणाल्या किशोरी ठाकरे ?

कॅफेतील गैरप्रकारांबाबत शिवसेनेच्या महिला नेत्यांनी गत आठवड्यात पोलिस अधीक्षकांनान निवेदनही सादर केले हाेते. यात काेणत्या परिसरात कॅफेमध्ये गैरप्रकार चालतात, याही मािहती स्पष्टपणे नमूद केली हाेती. त्यानुसार एक-दाेन ठिकाणी कार्यवाही झाली. 10-12 मुले आढळून आली हाेती. मात्र यामुळे अन्य कॅफेंचे संचालक सतर्क झाले. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका आहे. हे गैरप्रकार बंद हाेण्यासाठी सर्वच ठिकाणी एकाच वेेळी धाडसत्र राबविणे आवश्यक असल्याचे जिल्हा संघटिका देवश्री किशाेर ठाकरे म्हणाल्या.

आक्षेपार्ह साहित्य आढळले

अनेक कॅफेंचे शटर बंद करून आतमध्ये गैरप्रकार चालत असल्याचा आराेप शिवसेनेच्या महिला नेत्यांनी केला आहे. काही ठिकाणी आक्षेपार्ह वस्तुही सापडल्या आहेत. या ठिकणी तासाप्रमाणे पैसे वसूल करण्यात येतात. पोलिसांना कारवाई करण्यासह महापालिका प्रशासनानेही परवानगी देताना सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही महिला नेत्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...