आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅक्शन प्लॅन’चे पालकमंत्र्यांचे आदेश:चौधरी प्रकरणावरून वादळी चर्चा; डीपीसीच्या सभेत आमदार-जिल्हाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौधरी कोचिंग क्लासचा विषय सोमवारच्या नियोजन समितीच्या सभेत चांगलाच गाजला. मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने ‘चौधरी कोचिंग क्लास’च्या माध्यमातून राबवला होता. मात्र या एकाच क्लासला प्रशासनाने झुकते माप का दिले? अन्य क्लासलाही सहभागी का करून घेतले नाही? सरकारी यंत्रणेला वेठीस का धरण्यात आले? असा सवाल करत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी खुलासा करावा व नागरिकांना आवाहन करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. मात्र याला जिल्हाधिकारी नीमा आरोरा यांनी नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी आिण आमदार नितीन देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. अखेर पालकमंत्री बच्चू कडून यांनी महिला-विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, त्यांच्याशी चर्चा करा आिण कार्यवाहीचा ‘अॅक्शन प्लान’ सादर करा, असा आदेश प्रशासनाला दिला. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली होती. याप्रकरणी वसीम चौधरी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याच क्लासच्या माध्यमातून इयत्ता दहावीत असलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांसाठी नीट, आयआयटी, जेईई परीक्षांच्या पूर्वतयारीकरिता मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने ‘चौधरी कोचिंग क्लास’च्या माध्यमातून राबवला होता. दरम्यान, यावर नियोजन समितीच्या सभेत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रश्न विचारला. जिल्हाधिकाऱ्यांनी क्लासमध्ये जाण्याबाबत पालकांना आवाहन केल्याचे आ. देशमुख म्हणाले. त्यामुळे आता त्या क्लासमध्ये कोणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, असाही आग्रह देशमुख यांनी धरला. मात्र याला जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. खूप वेळ चर्चा रंगल्यानंतर पालकमंत्री कडू यांनी ‘अॅक्शन प्लान’ सादर करण्याचा आदेश दिला. सीआयडी चौकशीची मागणी शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी केली.

करा चौकशी : मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबवण्यात आिण याला ‘सुपर ७५’ या नावाने ओळखले जाऊ लागले. यासाठी चौधरीच्या कोचिंग क्लासकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल्याचे आ. देशमुख म्हणाले. लोकांनी नोंदणी केली. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी क्लासमध्ये जाऊ नये, असे आवाहन करावे, असे आ. देशमुख म्हणाले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आमदार देशमुख यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आ. देशमुख यांनी थेट चौकशीचीच मागणी केली. यावरून जिल्हाधिकारी व आमदार देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी यांनीही करा माझी चौकशी असे म्हणल्या.

बातम्या आणखी आहेत...