आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:गळा आवळून हत्या; मृतदेह तलावात फेकला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कापशीच्या तलावात २७ ऑगस्टला अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात तो मृतदेह शिंदे गटाचे शिवसेना उपशहर प्रमुखाचा असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालात युवकाचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आल्याने पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुख भागवत अजाबराव देशमुख (२८), रा. खडकी, अकोला असे हत्या करण्यात आलेल्या युवा नेत्याचे नाव आहे.

आठ दिवसांपूर्वी भागवत यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. २७ ऑगस्टला पातूर पोलिस ठाणे हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला होता. त्यानतंर मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे समोर आले होते. तलावात दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर पोलिसांनी २९ ऑगस्टला अंत्यविधीही उरकला. ३० ऑगस्टला पोलिसांनी पुन्हा पंचनामा करून परिसरातील पाहणी केली असता अर्धा किमी अंतरावर रुमालात आधार कार्ड व इतर काही वस्तू आढळल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या युवकाची बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलिस ठाण्यात दाखल होती.

बातम्या आणखी आहेत...